Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपचा आणखी एक मित्र दुरावणार

शिलाँग (वृत्तसंस्था) मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असे विधान केले आहे. भाजपाला एक-एक मित्र पक्ष सोडून जात असताना कॉनराड संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

एनडीएतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाटत पाहत आहोत, असे म्हणत त्यांनी भाजपाला सूचक इशाराच दिला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संगमा आणि मोदी सरकारमध्ये वाद आहे. या विधेयकावरून अनेक मित्र पक्षांनी भाजपाला एनडीएतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. जर केंद्र सरकारनं हे विधेयक राज्यसभेत आणले तर आम्ही तात्काळ एनडीएतून बाहेर पडू, असेही संगमा म्हणाले आहेत. एनपीपीच्या पाठिंब्यावरच मणिपूर आणि अरुणाचलमध्ये भाजपाचे सरकार आहे तर मेघालयमध्ये एनपीपीच्या सरकारला भाजपाचा पाठिंबा आहे. तसेच संगमा यांनी पूर्वोत्तर राज्यांतील दुसऱ्या पक्षांनाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचे अपिल केले आहे. लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक राज्यसभेत सध्या प्रलंबित आहे.

Exit mobile version