Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारलेजी म्हणून चिडविले अन् दोन गट भिडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारलेजी नावाने एकाला चिडविल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधात नशिराबाद पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पाहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील  भादली बुद्रुक येथे समीर दादामिया पटेल हा तरूण २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गावातील राममंदीर चौकातून समिर हा त्याचा चुलत भाऊ सोबत बाजारात जात होता. त्यावेळी गावातील गणेश राजेंद्र काटे, भुषण पुंडलिक कोळी, रितेश जगन कोळी, मोहित दिलीप कोळी सर्व रा. भादली बुद्रुक ता. जि.जळगाव यांनी समिरच्या चुलत भावाला पारलेजी म्हणून चिडविले. याचा जाब विचारला असता चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी समीर पटेल यांच्या फिर्यादीवरून गणेश राजेंद्र काटे, भुषण पुंडलिक कोळी, रितेश जगन कोळी, मोहित दिलीप कोळी यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

 

तर दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की,  भुषण पुंडलिक कोळी हा गावातील राममंदीराजवळून बाजारात जात असतांना पारलेजी चिडविल्याच्या कारणावरून समीर दादामिया पटेल, हुसेन बिस्मिल्ला पटेल, परवेज अनीस पटेल आणि अदनान जाकीर पिंजारी सर्व रा. भादली बुद्रुक ता.जि.जळगाव यांनी भुषण कोळी याला बेदम मारहाण करून दुखापत केली.  याप्रकरणी भुषण कोळी यांच्या फिर्यादीवरून  समीर दादामिया पटेल, हुसेन बिस्मिल्ला पटेल, परवेज अनीस पटेल आणि अदनान जाकीर पिंजारी यांच्या विरोधात नशिराबाद पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.

Exit mobile version