Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश भक्तांसाठी मोफत मोदी एक्स्प्रेसची घोषणा

मुंबई प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिल्यानंतर आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना मोफत रेल्वेची घोषणा करण्यात आली  असून याला मोदी एक्सप्रेस नाव देण्यात आले आहे. निलेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍यांसाठी मोदी एक्स्प्रेस धावणार असून आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे. १८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली असून प्रवासात एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार आहे. 

बुकिंगसाठी प्रवाशांना नितेश राणे मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक दिले आहेत. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री व संतोष कानडे यांना २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबदरम्यान फोन करुन जागा आरक्षित करायची आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

Exit mobile version