Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चुंचाळ्यात उद्या सुकनाथ बाबा मुर्ती स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात श्री समर्थ सुकनाथ बाबा मुर्ती स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

सन २००० साली श्री वासुदेव बाबांनी त्यांचे गुरु श्री समर्थ सुकनाथ बाबा यांची २१ किलो चांदीच्या मुर्तीची प्राणप्रतीष्ठा केली होती ती पंरपरा शिष्य व गावकरी मडळीनी सतत सुरु ठेवलेली आहे. या अनुषंगाने यंदा देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

असा होईल कार्यक्रम

सकाळी सहाला मारोती अभीषेक साडेसहाला सुकनाथ बाबा व रघुनाथ बाबा,वासुदेव बाबा,समाधीवाले बाबा,यांच्या मुर्तीला स्नान व मुर्ती अभीषेक साडेसातला आरती साडेआठ पासून भजन भारुडाना सुरुवात होईल दुपारी बाराला महाआरती होऊन एक वाजेपासून महाप्रसादास सुरुवात होईल महाप्रसाद रात्री शिष्य गणाच्या आगमणापर्यन्त सुरु राहील

अशी आहे आख्यायिका

श्री सुकनाथ बाबांनी येथे अखंड १२ वर्ष तप केल्याने या गावास महत्व प्राप्त झाले आहे. सुकनाथ बाबा काशी येथून भ्रमण करीत चुंचाळे येथे आले होते. बाबांना पशु-पक्षांची बोली अवगत होती. ते वर्षाकाठी पशुपक्षांना सहा ते सात क्विंटल धान्य दररोज खाऊ घालत होते. बारा वर्ष ज्या जागेवर बाबांनी तप केले त्या ठिकाणी असलेली मातीची टेकडी गावकरी मंडळीना उकरायला सागीतले असता त्यामंध्ये पुरातन समाधी निघाली. त्या दिवसापासून पुजा आरती सुरु करुन बाबांनी समाधीवाले बाबा अशी ओळख झाली.

श्री सुकनाथ बाबांनी ११० वर्षापुर्वी येथे बालकांना शिक्षणासाठी शाळा सुरु केली होती. बाबांना चुंचाळे येथेच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली ते म्हणजे श्री रघुनाथ बाबा होत. रघुनाथ बाबांनी नाथ साम्प्रदायाच्या प्रचारासाठी आपल्या हाती झेंडा घेत कार्य सुरु केले. त्यांच्यासोबत श्री वासुदेव बाबा हे स्वतः चे घर सोडून आध्यात्मिक कार्य करु लागले. श्री सुकनाथ बाबा व रघुनाथ बाबांनी वर्डी (ता.चोपडा)येथे समाधी घेतली आहे. गुरुंच्या आदेशाने श्री वासुदेव बाबांनी आध्यात्मिक व शैक्षणिक कार्य सुरु केले गावात मंदिराचे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे व सुकनाथ बाबा वनवासी वस्तीगृहाचे बाधकाम येथे करण्यात आले आहे.

२१ किलो पंचधातुची मुर्ती !

येथे कर्नाटकमधील उमदी गावातुन ९८ वर्षाच्या मुर्तीकाराने तयार केलेली २१ किलो पंचधातुची मुर्ती तयार करण्यात आली आहे. याच मुर्तीचे दोन वर्षानंतर म्हणजे २००० साली भक्ताच्या व गावकर्याच्या आग्रहाखातर प्राणप्रतीष्ठा करण्यात आली. श्री सुखनाथ बाबांच्या मुर्ती स्थापनेच्या वेळी गावातील सर्व धर्माच्या धार्मीक स्थळाना रंगरंगोटी केली होती. मुर्तीची मिरवणूक तडवी वाड्यातुन मस्जीद पर्यन्त गेल्याने सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला. यावेळी चातुर्मासाचा कार्यक्रम देखील होत असतो दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगणांनी व ग्रामस्थांनी केले आहे.

Exit mobile version