Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मानवाच्या कल्याणासाठीच अन्नकुट महोत्सवाची परंपरा – शास्त्री धर्म प्रसाद दास

annakut mahotsawa faizpur

फैजपूर प्रतिनिधी । विविध उत्सवांच्या माध्यमातून संत व हरिभक्त यांनी एकत्र येऊन सत्संग करून संस्कृती टिकून आहे व ती कधी नष्टही होणार नाही. संसारात राहूनही निष्पाप आणि मानवाच्या कल्याणासाठी अन्न कुट महोत्सवाचे महत्व व गो मातेला आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे. असे विचार स्वामी नारायण संप्रदायातील खानदेश गुरुमाऊली शास्त्री धर्मप्रसाददास यांनी व्यक्त केले.

स्वामी नारायण गुरुकुलात अन्न कुट महोत्सव व पंचगव्यचे विमोचन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास, शास्त्री राजेंद्र प्रसाद दास, आमदार शिरीष चौधरी, धर्मप्रकाशदास, स्वामी अनंत प्रकाशदास, स्वामी धर्म प्रिय दास, शरद भगत, दीपक भगत, वेदांतभगत, प्रा.व.पु.होले, पी.डी.पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे, मनोज पाटील आदी उपस्थित होते.

गोमाता ही सुख, शांती, समृध्दी, संपन्नता, मांगल्याचे प्रतीक मानली गेली आहे. सर्व वेद, उपनिष, पुराणे, धर्मशास्त्र, व सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात गिमातेचा महिमा सांगितला गेला आहे. गोमतेच्या पंच गव्य पासून तयार केलेल्या कामधेनू गोमय या पूजा, पाठ साहि पूजा पाठ साहित्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचा उपयोग घरातील पूजा पाठ, होम हवनसाठी करावा, असे आवाहन स्वामी नारायण गोशाळाचे संचालक शास्त्री भक्ती स्वरूप दास यांनी यावेळी करण्यात आले.

शास्त्री भक्तीकिशोरदास म्हणाले भगवंताच्या कृपेने व शेतकऱ्यानी मेहनत करून पिकविलेले धान्य हे दिवाळीच्या दिवसात उत्पन्न होते. सर्वात आधी ५६ भोग नैवद्य म्हणून अन्नकुट महोत्सवाची परंपरा अती प्राचीन काळा पासुन सुरु आहे.असे सांगून हरी भक्तांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वामी नारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्ती प्रकाशदास(अमेरिका) महामांडलेश्र्वर जनार्दन हरी महाराज, ना. हरिभाऊ जावळे,या मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दीपावली निमित्त लक्ष्मी पूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीहनुमानजी पूजन, वही पूजन व शारदा पूजन, गोवर्धन पूजा, अन्नकुट आरती, भजन संध्या, संत प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी श्रीहरी ट्रॅव्हलचे संचालक सुनील चौधरी, राजु चौधरी, हेमराज चौधरी, नंदु पाटील, नितीन महाजन, निळकंठ भारंबे यांच्यासह रावेर, यावल तालुक्यातील हरीभक्त उपस्थित होते. सूत्र संचालन शास्त्री भक्ती किशोर दास यांनी केले.

Exit mobile version