Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती अन लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

d8eb87d5 9de5 4b5b 8bfa bf80fd7edeb6

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सेवानिवृत्त शिक्षक गजमल पाटील होते. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री. गावंडे, महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. काळे, ग्रंथालयाचे अध्यक्ष विवेक जाधव, रमेश बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. महात्मा फुले पतसंस्थेचे उपाध्यक्ष मोतीलाल बनकर होते. शुभम जाधव, अविनाश जाधव, राणा वारुळे तसेच भास्कर बाविस्कर व सुधाकर शेजुळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखाराम शिरसागर, हरिश्चंद्र जाधव, सुरेश चौधरी, वैशाली सपकाळ आणि कल्पना चौधरी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक जाधव यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र जाधव यांनी केले.

Exit mobile version