अंजनी प्रकल्पासाठी २३२ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी : आ. चिमणराव पाटील

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंजनी प्रकल्पासाठी सुधारित २३२ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे.

एरंडोल तालुक्यासह परिसराला वरदान ठरणार्‍या अंजनी मध्यम प्रकल्पाला वाढीव निधीची आवश्यकता होती. या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे या प्रकल्पाच्या कामासाठी, सुमारे २३२ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे.

अंजनीप्रकल्पासाठी लागणार्‍या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे, प्रकल्पाची सिंचन क्षमता पूर्ण होऊन, सुमारे २८३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली होती. यामुळे सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा लाभ मिळणार आहे. एरंडोल तालुक्यातील सुमारे २०६८ हेक्टर आणि धरणगाव तालुक्यातील ७६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Protected Content