Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी अंजली बारेला हिने मिळवले केन्द्रीय नवोदय परिक्षेत यश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव ते डोणगाव मार्गावरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलची इयत्त आठवीची आदिवासी विद्यार्थीनी अंजली मन्साराम बारेला हिने नवोदय परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. केंन्द्रीय नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला व दरवर्षाप्रमाणे यावर्षीही इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावची विद्यार्थीनी अंजली मन्साराम बारेला हीने नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिने स्कुलच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

इंग्लिश स्कुलच्या माध्यमातुन प्रत्येक वर्षी या परिक्षेत एक ते दोन विद्यार्थी नवोदय परिक्षेत उतीर्ण होतात. अंजली मन्साराम बारेला या आदिवासी विद्यार्थीनीच्या नवोदय परिक्षेतील यशाबद्दल स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, प्रा. अशोक प्रतापसिंग पाटील, उपप्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव व स्कुलचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-पालकांनी अंजलीने यश मिळवल्याबद्दल विशेष कौतुक करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version