Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्व. अनिलदादा बोरोले यांच्या श्रद्धांजली सभेचे मंगळवारी आयोजन

d36e969b b0b2 4a41 a04d 4457e051bcc6

जळगाव, प्रतिनिधी | स्व. अनिलदादा बोरोले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी (दि.१६) एका सभेचे रोटरी भवन, मायादेवी नगर येथे सायंकाळी ५.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सर्वांसाठी खुली आहे.

 

अनिलदादांचे व्यक्तिमत्व अतिशय निगर्वी होते. सगळ्यांच्या सुख-दु:खात धावून जाणारे दादा समाजात तसेच समाजाबाहेरील वर्तुळातही लोकप्रिय होते. द्वारका इंडस्ट्रीजचा कारभार यशस्वीपणे सांभाळत दादांनी नेहमीच समाजकार्यासाठी वेळ काढला. म्हणूनच त्यांच्याकडे रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट) चे अध्यक्षपदही चालून आले होते. दादा सध्या जळगाव जिल्हा लेवा पाटीदार समाज मंडळाचे अध्यक्ष होते. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले अनिलदादा अचानकपणे आपणातून निघून गेले आहेत. ही गोष्टच अनेकांना अजूनही खरी वाटत नाही. दादांवर प्रेम करणाऱ्यांनी सभेला आवर्जून उपस्थित राहून आदरांजली वाहावी, असे आवाहन
रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट) आणि अनिलदादा बोरोले मित्र परिवाराने केले आहे.

Exit mobile version