म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अनिल वाढे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रयोगशाळा सहाय्यक अनिल लक्ष्मण वाढे यांचा हे सेवा निवृत्तीचा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला.

शनिवार, दि ३० एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३६ वर्षे सेवा दिली. त्यानिमिताने शाळेत त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक के.टी. तळेले, पर्यवेक्षक एस.ओ सराफ, शिक्षक, शिक्षिका. कर्मचारी वृंदा यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content