Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नी माहेरी गेल्याचा रागातून मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्नी ही माहेरी गेल्याचा रागातून पतीसह सासरकडील मंडळींनी पत्नीसह तिच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चर्चेचा विषय ठरला आहे.

अधिक माहिती अशी की, “यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवाशी प्रकाश रामधन भिल हा पत्नी मनिषा प्रकाश भिल आणि कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार ४ मे रेाजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रकाश भिल यांची पत्नी मनिषा ह्या गावातच तिच्या माहेरी आईवडीलांकडे गेल्या होत्या.

याचा राग आल्याने पती प्रकाश रामधन भिल, रामधन नथ्थून भिल, किसन रामधन भिल, चंद्राबाई रामधन भिल, नबाबाई जंगली भिल, इंदुबाई विलास कोळी आणि विमल प्रकाश कोळी सर्व रा. अट्रावल यांनी विवाहिता मनिषा आणि तिची बहिण ललिता गोपाळ भिल आणि तिची आई सिंधूबाई सुनिल भिल यांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. तर विवाहितेच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.” याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version