Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीसात तक्रार दिल्याचा राग; महिलेला दोघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात विरोधात तक्रार दिल्याच्या कारणावरुन महिलेला दोन जणांनी अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच धारदार शस्त्राने दुखापत करण्याची धमकी सुध्दा दिली आहे. या घटनेप्रकरणी गुरुवारी  रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील म्युन्सिपल हॉस्पीटलच्या मागील बाजूस ४१ वर्षीय वास्तव्यास आहेत. या महिलेने ती राहत असलेल्या परिसरात राहणाऱ्या सलमान शेख रईस  व सज्जो शेख रईस या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या रागातून ८ ऑगस्ट रोजी सलमान रईस व सज्जो रईस या दोघांनी महिला राहत असलेल्या ठिकाणी येवून तिला धारदार शस्त्राने दुखापत करुन विरुध्द तक्रार दिली, तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली, तर सज्जा शेख हिने  महिलेला अश्लिल शिवीगाळ केली, या बाबत महिलेने दोन दिवसानंतर गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाण्या तक्रार दिली, या तक्रारीवरुन  सलमान शेख रईस  व सज्जो शेख रईसया दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहेत.

Exit mobile version