Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाळू वाहतूक रोखल्याचा राग; तलाठ्यास धक्काबुक्की

रावेर-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरला तलाठ्याने रोखल्याचा राग आल्याने ट्रक्टर चालक व त्याच्या साथीदाराने तलाठ्या धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धटना घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील रसलपुर-के-हाळा रस्त्यावर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी १०.३० वाजेच्या सुमारास तलाठी रवी भागवत शिंगने जात होते.के-हाळे येथे अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर ट्रॉली दिसल्याने तलाठी शिंगने यांनी ट्रक्टर थांबवले. ट्रक्टर चालक मोहम्मद इतबार तडवी व त्याचा अशपाक उर्फ करण तडवी दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला व तलाठी यांना धक्काबुक्की केली तर करण तडवी याने वाळूने भरलेली ट्रक्टर ट्रॉली चोरुन घेऊन पसार झाला. याबाबत रावेर पोलिस स्थानकात आरोपी विरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटवाडा येथील अनेक ट्रक्टरे दरोरोज मोठ्या प्रमाणात सकाळच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करीत असतात याकडेही महसूल पथकाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version