Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहुर येथील अंगणवाडीची संततधार पावसामुळे दैनावस्था

pahur 1

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । संततधार पावसामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गाजवळील संत रूपलाल महाराज नगर येथील अंगणवाडी क्रमांक 17 ची दैन्यावस्था झाली आहे. अंगणवाडी गळू लागल्याने विद्यार्थ्यांना पटांगणात बसावे लागत आहे.

अधिक माहिती अशी की, संत रुपलाल महाराज नगर येथील अंगणवाडी क्रमांक 17 ची अतिशय अवस्था खराब झाली असून विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अंगणवाडीच्या खोलीत अक्षरश: पाणी तुंबल्याने विद्यार्थ्यांना पटांगणात बसावे लागते होते. अंगणवाडी सेविकांसह मदतनीस यांनी खोलीतील पाणी बाहेर फेकले. अंगणवाडी गळू लागली असल्याची माहिती सेविकांनी वारंवार संबंधित ग्रामपंचायतीस दिली. मात्र याकडे दुर्लक्ष केले जातात असल्याचं चित्र पाहवायास मिळाले आहे. याचबरोबर, परिसरातील काही घरांची पडझड झाली असून अनेक स्लॅपची घरे ही गळू लागली आहे.

Exit mobile version