Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

….आणी अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मदतीला धावले पालकमंत्री !

जळगाव प्रतिनिधी । मंत्रीपद असूनही याचा कोणताही बडेजाव न मिळवता सर्वसामान्यांच्या सेवेसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे सातत्याने प्रयत्नशील असतात याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे. रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या शेतकर्‍याला ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मदत केल्याची घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज दुपारी दापोरा येथून उमाळ्याकडे जात होते. याप्रसंगी त्यांना रस्त्यावर अपघातात जखमी झालेला व्यक्ती विव्हळत असल्याचे दिसले. ना. पाटील यांनी तातडीने आपल्या ताफ्याला थांबवून अपघातग्रस्ताशी वार्तालाप केला. यात संबंधीत व्यक्तीला मुका मार लागल्याचे त्यांना दिसून आले. पालकमंत्र्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील वाहन देऊन संबंधीत व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून दिले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, आदिवासी कोळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश सोनवणे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Exit mobile version