Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…आणि अखेर श्रीलंकेचे पंतप्रधानांनी दिला राजीनामा

श्रीलंका वृत्तसंस्था  । गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या नागरिकांची निदर्शने सुरु होती. दरम्यान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

“मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन करतो आणि लक्षात ठेवा की, हिंसेने फक्त हिंसाचार वाढेल. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध असल्याचे” पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनाम्यापूर्वी ट्विट केले आहे.

श्रीलंकेत होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांदरम्यान राजपक्षे यांचा राजीनामा देण्यात आला आहे, महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ जमलेल्या सरकारविरोधी निदर्शनं करणाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलीसांनी शहरात कर्फ्यू लागू केला. महिंदा राजपक्षे यांच्यावर त्यांच्याच श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षाच्या नेत्यांकडून राजीनामा देण्यासाठी दबाव होता. या दबावाविरुद्ध ते पाठिंबा गोळा करत होते. मात्र अखेर त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे. महिंदा यांचे धाकटे बंधू आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली. राजपक्षे यांनी १ एप्रिल रोजी त्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू असताना आणीबाणीची घोषणा केली होती. मात्र ५ एप्रिल रोजी ही आणीबाणी मागे घेण्यात आली आहे.

 

Exit mobile version