Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आनंदीबाई बंकट मुलींच्या शाळेत प्रवेशोत्सव साजरा

241e76ba 2672 4101 a25a 2a4085b44551

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलींच्या हायस्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पाचवीत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनींचे शाळा समितीचे चेअरमन ॲड. प्रदीप अहिरराव यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रथम दिवशी शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळा देखील ॲड. प्रदीप अहिरराव, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका संजय शाह, उपमुख्याध्यापक का.नी तडवी,पर्यवेक्षक बी .बी महाजन, शिक्षक प्रतिनिधी प्रवीण राजपूत, कार्यालयीन प्रमुख व वरिष्ठ लिपिक रमेश रोकडेयांच्या शुभहस्ते देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, ग्रंथपाल विजय ठोके, सेवक वर्ग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन दिलीप जैन यांनी केले.

Exit mobile version