Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे वृध्दाला लिप्ट देऊन लुटले

यावल ( प्रतिनिधी ) येथील शहरातुन भुसावळला जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तिचे मोटरसायकल स्वाराने त्या प्रवासी व्यक्तिस भुलथापा मारून पैसे घेवुन पोबारा केल्याची घटना घडली असून याबाबत पोलसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबतचे वृत्त असे की यावल तालुक्यातील विरावली येथील राहणार्‍या व यावल येथे एका हॉटेलमध्ये मजुरी करणारे उखर्डू मेहबुब तडवी (वय ६९ वर्ष) हे काल दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ येथे जाण्याकरिता यावल शहरातील भुसावळ टी पाँईट या रिक्शा व बस थांब्याजवळ वाहनाच्या प्रतिक्षेत होते. याप्रसंगी एका अनोळखीच्या अज्ञात व्याक्ति हा त्या ठिकाणी त्याच्याकडील बिना क्रमाकांच्या मोटरसायकलस्वार तरुणाने तुम्ही कुठ जात आहात ? अशी विचारणा करून चला मी भुसावळला जात आहे असे सांगुन त्यांना गाडीवर बसविले.

मोटरसायकल हे यावल शहरातील फालकनगर बसथांब्यावर जाताच त्या अज्ञात व्यक्तिने मोटरसायकल थांबवुन कुणाशी तरी बोलु लागला व नंतर मला एकाला पैसे द्याचे आहे असे सांगुन माझ्याकडे सुटे पैसे नाही तेव्हा तुमच्याकडे पाचशे रूपये सुटे आहे का ? अशी विचारणा केली. यामुळे तडवी यांनी त्यांच्या कडील खिशात असलेली साडेचार हजार रुपये बाहेर काढले. संबंधीत मोटारसायकलस्वार हे सर्व रूपये घेऊन पळून गेला. यामुळे तडवी यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.

Exit mobile version