Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून केली युवकाची हत्या

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रुग्णालयातील काम आटोपून घरी जात असताना एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खून झालेला तरुणाचे नाव मयुरेश यशवंत चव्हाण असे आहे. तो सांगलीत एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. खून झालेल्या घटनास्थळी तरुणाची एक बाईकही आढळली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. काल रात्री तो हॉस्पिटलमधून काम आटपून बाहेर पडला. त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा तपास संजय नगर पोलीस करीत आहेत. आरोपी पकडण्यासाठी इतर ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Exit mobile version