Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली रेल्वेरूळच्या अप लाईनवर एक अनोळखी तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते शिरसोली रेल्वे रूळच्या अप लाईनवरील खंबा क्रमांक ४१३ च्या २ ते ४ जवळ धावत्या रेल्वेतून एक अनोळखी तरूणाचा पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जळगाव तालुका पोलीसांनी मयत अनोळखी तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा पुढीलतपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.

Exit mobile version