Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे मालगाडीच्या धक्क्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे मालगाडीचा धक्का लागल्याने अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२०/२३-२५ दरम्यान बुधवार ५ ऑक्टोबर रेाजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंदाजे ५५ वर्षीय अनोळखी पुरूषाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. रेल्वे लोकोपायलट सरोजकुमार यांनी जळगाव रेल्वे स्थानकाचे उपस्टेशन प्रबंधकांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री यांच्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन भावसार करीत आहे.

Exit mobile version