Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेचा धक्क्याने अनोळखी पुरूषाचा मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव रेल्वे स्थानक जवळ धावत्या रेल्वे मालगाडीचा धक्का लागल्याने एका अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ३३२च्या २८ नंबरच्या खंब्याजवळ शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता धावत्या रेल्वे मालगाडीच्या धक्क्याने अंदाजे ४२ वर्षीय एका अनोळखी पुरूषाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत मालगाडीचे लोकोपायटल अलोक मिश्रा यांनी वॉकी टॉकीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रात्री ९ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहे.

Exit mobile version