Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्नड घाटात अनोळखी मृतदेह आढळला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील कन्नड घाटाच्या खोलदरीत एका अनोळखी प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.  याप्रकरणी ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव-कन्नड दरम्यान असलेल्या कन्नड घाटातील मेन बत्तीजवळील १५ फूट खोल दरीत एका ४२ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवार २५ रोजी १:३० वाजेच्या पुर्वी आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहाची कोणतीही आढळून आली नाही. याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहे.

Exit mobile version