Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनाथ महिलेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुणांनी केले अंत्यसंस्कार

वरणगाव, प्रतिनिधी  । भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील अनाथ महिलेवर वरणगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यानी अंत्यसंस्कार करून पुन्हा एकदा माणुसकी जीवंत असल्याचे उदाहरण दाखवून दिले आहे. 

 

“जनसेवा ही ईश्वर भक्ती बोध यातला उमजू या” या उक्तीप्रमाणे कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागील दीड वर्षांपासून काम करत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आणि भयावयह स्थिती तयार झाली. कोणाचा नैसर्गिक मृत्यू जरी झाला तर सर्वांच्या मनात पहिली भीती की कोरोनामुळे तर झाला नसेल असे प्रश्न पडतो. पण या संकटकाळात सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जिथे कमी तिथे आम्ही या तत्वावर काम करत आहे. फुलगाव येथील  चंद्रभागा सीताराम सुतार (वय 65 वर्ष ) या अनाथ महिलेचा आज मृत्यू झाला. मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्यामुळे कोणीही अंत्यसंस्कार करायला पुढे येत नव्हतं. अशातच ही माहिती वरणगाव येथील स्वयंसेवकाना कळताच त्यांनी तात्काळ धावून महिले सोबत असलेल्या दोन नातेवाईकांना सोबत घेऊन धीर दिला. आणि अंत्यसंस्काराची सर्व प्रक्रिया पार पाडली. स्वयंसेवकांनी कोरोनाचे सर्व दिशा दर्शकाचे पालन करून महिलेवर हिंदू रितिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले. या कामात हितेश भंगाळे, गौरव श्रीखंडे, नथ्थु कोळी, भरत चंदने इत्यादी  या स्वयंसेवकानी पुढाकार घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वरणगाव यांनी गरजूंना रक्त पुरवणे, प्लाजमा पुरवणे, लसीकरणाबद्दल दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देणे असे अनेक उपक्रम राबवत आहे.

 

Exit mobile version