Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बस प्रवासात वृध्द महिलेची सोन्याची पोत लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथे जाण्यासाठी बसने निघालेल्या वृध्द महिलेची १८ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना धरणगाव तालुक्यातील रोटवद फाट्याजवळ लक्षात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शकुंतला माणिकराव बोरसे वय ७० रा. फुले नगर, चोपडा या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने वृध्द महिला बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी धरणगाव येथे आलेल्या होत्या. त्यानंतर चोपडा जाण्यासाठी धरणगाव येथून बसमध्ये बसल्या. बसमध्ये प्रवास करत असतांना त्यांच्या गळ्यातील १८ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

हा प्रकार दुपारी ४ वाजता धरणगाव तालुक्यातील रोटवद फाट्याजवळ लक्षात आला. सोन्याची पोतची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार करीम सैय्यद हे करीत आहे.

Exit mobile version