Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोक्यावर लाकडी शिंगाडे हाणल्याने वृध्द गंभीर जखमी

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराच्या सामाईक भिंतीचा खर्च वारंवार मागत असल्याच्या कारणावरून एकाने वृध्दाच्या डोक्यात लाकडी शिंगाडे टाकून गंभीर दुखापत केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृध्द गंभीर जखमी झाले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील होळी मैदान परिसरात विश्वास जयराम पाटील (वय-७०) हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी राजेंद्र बाजीराम पाटील (वय-५५) हे राहतात. त्यांच्या घराची सामाईक भिंत बांधण्यात आली होती. याचा खर्च देण्यात यावा अशी मागणी शेजारी राहणारे राजेंद्र पाटील यांच्याकडे केली होती. याचा राग मनात ठेवून संशयित आरोपी राजेंद्र पाटील याने हातातील लाकडी शिंगाडे विश्वास पाटील यांच्या डोक्यात टाकून गंभीर जखमी केले व जीवेठार मारण्याची धमकी दिली.  यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. याबाबत वृध्दांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेंद्र पाटील याच्यावर चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजित सावळे करीत आहे.

Exit mobile version