Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्दाचा जागीच मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दिनकर नगरात राहणारे ७२ वर्षीय वयोवृध्दाला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सुरेश दयाराम बाविस्कर (वय-७२) रा. दिनकर नगर, मोहन टॉकी जवळ जळगाव असे मयत वृध्द व्यक्तीचे नाव आहे.

 

शनीपेठ पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बाविस्कर हे पत्नी, तीन मुले यांच्यासह शहरातील दिनकर नगरातील मोहन टॉकीज येथे वास्तव्याला आहे. रविवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी बाहेर फिरून येतो असे सांगून ते घराबाहेर पडले. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास आसोदा रेल्वे गेट जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, तीन मुले ज्ञानेश्वर, गणेश आणि संतोष ही तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version