Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोकरबारी येथील वृद्ध शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

पारोळा प्रतिनिधी । तालुक्‍यातील भोकरबारी येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा विहिरीच्या पाण्यात  बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. 

प्रकाश रतन बडगुजर (वय 62) हे शेतकऱ्याचे नाव आहे. मृत प्रकाश बडगुजर हे 14 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता  सुनेला मी शौचास जातो असे सांगून गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. सुनेने याबाबत नातेवाईकांना माहिती दिल्यावरून त्यांचा शोध घेतला होता. त्यातच आज दुपारी बारा वाजता भोकरबारी शिवारातील लक्ष्मण कौतिक पाटील यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृत्यूदेह तरंगताना दिसून आला. पुतण्या रवींद्र बडगुजर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.. मृत शेतकऱ्याचे पत्नी पाच वर्षांपूर्वीच मृत पावली आहे. ते आता विधवा सून व एक नातूसह राहत होते.  त्यांच्याकडे एक ट्रॅक्टर व गुरेढोरे देखील होती. ते  ते विहिरीत पडले की त्यांनी आत्महत्या केली याबाबत मात्र अधिक माहिती समजू शकली नाही. घटनेचा पुढील तपास हवालदार रवींद्र रावते हे करीत आहेत.

 

Exit mobile version