लेवा पाटीदार समाजाचा आंतरराष्ट्रीय वधू-वर मेळावा

सावदा प्रतिनिधी । समता भ्रातृ मंडळातर्फे लेवा पाटीदार समाजाचा भव्य आंतरराष्ट्रीय विवाहेच्छूक वधू-वर मेळावा दि. २०, २१ नोव्हेंबर २०२१ (रविवार) रोजी कै. अंकुशराव लांडगे सभागृह (भोसरी, पुणे) किंवा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून आयोजित करण्याचे मंडळाने योजिले आहे.

तरी केंद्र शासनाच्या करोना विषाणू नियमांवर आधारित परवानगीनुसार वरील मेळावा हा प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबद्दलची घोषणा ही समाजबांधवांपर्यंत मेळाव्याच्या १० दिवस अगोदर एस एम एस किंवा वृत्तपत्राद्वारे कळवण्यात  येईल. ह्या मेळाव्यासाठीची नाव नोंदणी ही ऑनलाईन माध्यमातून www.samatabhratrumandal.com ह्या संकेत स्थळावर मोफत करण्याची सुविधा मंडळाने केलेली आहे.नाव नोंदणीची  अंतिम मुदतीची तारीख १५ ऑक्टोबर २०२१ ठेवण्यात आली आहे.

ह्या मेळाव्याला  माजी खासदार  डॉ .उल्हास पाटील जळगाव ,आ शिरीषदादा चौधरी रावेर,आ सुरेश भोळे जळगाव , महेशदादा लांडगे ( आमदार भोसरी ) , आं लक्ष्मणभाऊ जगताप  चिंचवड, नामदेव ढाके ( पि.चि. सत्तारूढ पक्षनेते ) हे मान्यवर प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत . . समता भ्रातृ मंडळ हा वधू – वर मेळावा कार्यक्रम मागील १७ वर्षापासून एक सामाजिक कार्य म्हणून आयोजित करत आलेले आहे व उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढेही करत राहील.

लेवा समाज बांधवांसाठी देश विदेशातून ऑनलाईन माध्यमातून नाव नोंदणी करण्याची मोफ सुविधाwww.samatabhratrumandal.com लोकांच्या प्रतिसादात्मक आग्रहानूसार भव्य दिव्य अश्या प्रत्यक्ष व ऑनलाईन मेळाव्याचे लाईव्ह प्रक्षेपण . डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून Android App ची सुविधा वधू – वर आणि पालक ह्यांच्यासाठी उपलब्ध एप जग भरातील कानाकोपर् यातुन भरपूर नावे असलेली रंगीत ( कलर ) व बिनचूक सूची  लेवा पाटीदार  समाजबांधवांसाठी  उपलब्ध राहील. सर्व लेवा पाटीदार समाज बांधवांच्या शंकांचे त्वरित निवारण करण्यासाठी टोल फ्री नं ०२०७११७३७३३ म

वधू / वर आणि पालकांना एकाच वेळेस संभाषण व चर्चा करण्यासाठी योग्य व सुरक्षित असे अॅप . t . वधू – वर परिचय पुस्तिका ( सूची ) घरपोच मागवण्यासाठी courier सुविधा उपलब्ध आहे तरी समाज बांधवांनी या नाव नोंदणीत लाभ असे समता भातृ मंडळ अध्यक्ष  सिताराम गणपत राणे,सचिव

रवींद्र नामदेव बर्‍हाटे,शाम पाटील यांनी आवाहन केले आहे.

 

Protected Content