पिंप्राळा परिसरातून लांबविला एकाचा महागडा मोबाईल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा येथील भाजी बाजारातून एका तरूणाचा ४३ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत रामकृष्ण निखाडे (वय-३३) रा. देवराम नगर, कमला पार्क, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. पिंप्राळा येथे बुधवारचा भाजी बाजार असल्याने ते सांयकाळी ६ वाजता भाजीपाला बाजारात आले होते. त्यावेळी त्यांच्या खिश्यातील ४३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलीसात धाव घेवून रात्री ११ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.

 

Protected Content