Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेशन मिळत नसल्याची तक्रार घेवून आलेल्या वृध्द दाम्पत्याला मिळाला न्याय; तहसिलदारांचे मानले आभार

धरणगाव प्रतिनिधी । येथील वृध्द दाम्पत्याला रेशनकार्ड असूनही धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या वृध्द दाम्पत्यांच्या तक्रारी दखल तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तत्काळ दखल घेवून न्याय मिळवून दिला आहे. न्याय मिळवून दिल्याने निराधार दाम्पत्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

धरणगाव शहरातील रहिवाशी जगन्नाथ सुपडू बडगुजर (वय-८१) व त्यांची पत्नी देवकाबाई जगन्नाथ बडगुजर (वय-७८) या निराधार वृध्द दाम्पत्याला रेशन मिळत नसल्याची तक्रार घेवून तहसील कार्यालयात आले होते.  दाम्पत्य धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन आलेले पाहून तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी स्वतः त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. संबंधित रेशन दुकानदार यांना सांगून या वृध्द दाम्पत्यांना तात्काळ गहू व तांदुळाचा लाभ मिळवून दिला. आस्थेवाईकपणे चौकशी करून या वृध्द दाम्पत्यांना शासकीय वाहनातून घरी सोडण्याची व्यवस्था केली. या अनुभवाने ते वृध्द दाम्पत्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थी, शेतकरी आणि वृध्दांच्या अडअडचणी सोडविण्यासाठी आपला अग्रक्रम असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी बोलतांना दिली.

Exit mobile version