Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न ; जळगावात खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जैनाबादमध्ये देखील एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी १० डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकारे शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माहितीसाठी धाव घेतली.

जळगाव शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. समता नगर परिसरामध्ये आज रविवारी दुपारी ३ वाजता एका तरुणाचा खून झाल्याची तसेच दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघड झाली. त्यानंतर अवघ्या सहा तासानंतर जैनाबाद येथे दुसरी घटना घडली आहे. डिगंबर दिनकर सैंदाणे (वय २५, रा. जैनाबाद, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो जैनाबाद परिसरामध्ये एकटा राहत असल्याची माहिती मित्रांनी दिली.

तो परिसरात नाश्त्याची हातगाडी लावून उदरनिर्वाह करतो. दरम्यान संध्याकाळी त्याने हातगाडी बंद केल्यानंतर जेवणासाठी मासे घ्यायला जैनाबाद परिसरात गेला होता. तेथे अज्ञात तरुणांशी त्याचा कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातून अज्ञात तरुणांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवण्याचा गंभीर प्रयत्न केला. या प्राणघातक आलेल्या त्याच्या डाव्या डोळ्याला व हनुवटीलादेखील मार लागला आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी व त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याचेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले आहे.

Exit mobile version