Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंपरखेड येथील प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपरखेड येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा तालुक्यातील वलठाण येथील धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवाशी प्रभू विठ्ठल पवार (वय-४५) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ३० मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वलठाण शिवारातील धरणात पोहण्यासाठी गेले. पोहतांना अचानक ते पाण्यात बुडाले त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार नातेवाईक कृष्णा सुदाम दडवी रा. शामवाडी ता. चाळीसगाव यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहे.

Exit mobile version