Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झाडावर दुचाकी आदळल्याने प्रौढाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणा रस्त्यावरच्या खेड़ी फाट्यावर झाडाला दुचाकी आदळून दुचाकीस्वार प्रौढाचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून भानुदास गोपाळ जाधव (वय 45, रा.संत मीराबाई नगर, पिंप्राला परिसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसानी दिलेली माहिती अशी क़ी, भानुदास जाधव हे संत मीराबाई नगरात कुटुंबासह राहत होते. गुरुवारी ते रात्री कानळदाकड़े जाण्यासाठी घरातून दुचाक़ीने निघाले. रात्री 9 वाजेच्या सुमारास आव्हाणा रस्त्यावरच्या खेड़ी फाट्यावर त्यांचा दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडाला जावून आदळली. यात जाधव यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यु झाला. ही घटना कुटुंबीयांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश केला. यानंतर जाधव यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी जाधव यांना तपासणी अंती मृत घोषित केले. यावेळी रुग्णालयात उशिरापर्यत नातेवाईकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्यातील अनिल फेगडे, संजय भालेराव, गुलाब माळी, रामकृष्ण इंगले यानी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला.

 

Exit mobile version