Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breaking News : तिसऱ्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍ यूज प्रतिनिधी । मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात राहणारे ५० वर्षीय व्यक्ती हे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२) रा. नित्यानंद सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव असे मयताचे नाव आहे.

उल्हासराव चंद्रराव पाटील हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह मोहाडी रोडवरील नित्यानंतर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर वस्तव्याला होते. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते. सध्या दिवाळी असल्याने गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसाफाईचे काम करत होते. साफसाफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच गर्दी जमली होती. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, मुलगा हितेश आणि मुलगी हर्षदा असा परिवार आहे. हर्षदा ही बीडीएसचे शिक्षण घेतले आहे तर हितेश हा बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version