बटाट्यांच्या पेटीत आढळला ८ फुट लांबीचा अजगर

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी बटाट्याच्या पेटीत ८ फूट लांबीचा अजगर आढळला आहे. चंद्रपूरजवळील लोहारा येथील हॉटेलमध्ये हा अजगर आढळला आहे. हॉटेलमधील एका बटाट्याच्या पेटीत हा साप होता. हॉटेलमधील कर्मचारी पेटीतील बटाटा काढण्यासाठी गेला असता त्याला हा साप दिसला.

पेटीत बटाट्यांच्यावरच वेटोळे घालून हा अजगर बसला होता. हा भलामोठा साप पाहताच कामगार पळून गेला आणि त्याने हॉटेलमालकाला यासंदर्भातील माहिती दिली. हॉटेल मालकाने तातडीने स्थानिक सर्पमित्राला याची माहिती दिली. त्याने बटाट्याच्या पेटीतून साप गोणीत टाकला. त्यानंतर त्याला लोहारा जंगलात सोडण्यात आले.

Protected Content