Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पूर्णा नदीपात्रात बुडून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पूर्णा नदी पात्रात एका ११ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, वाळू उपसा केल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यात तो बुडाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन (पुर्ण नाव माहित नाही) हा पुर्णा नदी पोहण्यासाठी गेला होता. मात्र, नदीपात्रात यंत्राद्वारे खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी नदीपात्रात मुलाचा तात्काळ शोध घेवून त्याला शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला तर गावकऱ्यानी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. वाळूमाफियांकडून होणार वाळू उपसा थांबवा, आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान,  ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल जवंजाळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेत चौकशी अंतर्गत गुन्हा दाखल करू, असे नातेवाईकांना सांगितले. त्यावर पोलिसांनी मुलांच्या नातेवाइकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे.

 

 

Exit mobile version