Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमोलभाऊ शिंदे शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे आयोजित अमोलभाऊ शिंदे चषक अंतर्गत पाचोरा – भडगाव तालुकास्तरीय आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खा. उन्मेष पाटील यांच्याहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. पाचोरा – भडगाव तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ७६ शाळा २३५५ क्रीडापटू सहभागी झालेले आहेत.

खा. उन्मेष पाटील यांच्याहस्ते स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू स्वर्गीय पेले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या उद्घाटन समारंभाला जागतिक कीर्तीची धावपटू मोनिका आथरे, गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे, कृउबा समितीचे माजी सभापती सतीश शिंदे, नगरसेविका सिंधुताई शिंदे, पूजा शिंदे, मोनिका आथरे हिचे मार्गदर्शक एच. एस. काळे, संस्थेचे सचिव अॅड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष निरज जैन, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, युवा नेतृत्व तसेच भाजपा पाचोरा – भडगावचे नेते अमोल शिंदे, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील उपस्थित होते.

उद्घाटन सत्राच्या प्रमुख अतिथी मोनिका आथरे व एच. एस. काळे यांनी उपस्थित क्रीडापटूंना मार्गदर्शन केले. खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत क्रीडापटू व क्रीडा शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अमोल शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात घेण्यात आलेल्या आंतर शालेय क्रीडा स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करून मुलांना विविध खेळ व क्रीडा प्रकारात सहभागी होण्याचे आणि शरीर संपत्तीचे जतन करण्याचे आवाहन केले. विजेता शर्मा व प्रा. शिवाजी शिंदे यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक केले. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणावर ३१ डिसेंबर २०२२ ते ०२ जानेवारी २०२३ दरम्यान या स्पर्धा संपन्न होत आहेत.स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी कबड्डी खेळ प्रकारात मुलांचे ४९ तर मुलींच्या २२ संघांनी सहभाग घेतला. खो – खो च्या खेळात मुलांचे १८ संघ व मुलींचे १५ संघ सहभागी झाले. फुटबॉल क्रीडा प्रकारात मुलांचे ९ तर मुलींचा १ संघ सहभागी झाला होता.आणि हॉलीबॉल खेळ प्रकारामध्ये मुलांचे १८ तर मुलींचे १२ संघ सहभागी झाले होते.

अमोलभाऊ शिंदे चषक या शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला माजी पं. स. सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार व संजय पाटील, तसेच भाजपा ओ.बी.सी. आघाडीचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप बापू पाटील, प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजपाचे शहर सरचिटणीस दीपक माने, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान मुळे, प्रा. प्रताप तावरे, माजी सभापती वसंतराव गायकवाड, मा. पं. स सदस्य ज्ञानेश्वर सोनार, उद्योजक रुपेश शिंदे तसेच भाजपा युवा मोर्चा आणि भाजपा महिला आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version