Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गांधलीपूरा भागातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात अमळनेर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गांधलीपूरा भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार ९ जानेवारी रोजी सकाळी अल्पवयीन मुलीची आई व भाऊ हे कामाला निघून गेले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही घरात एकटीच होती. दरम्यान, दुपारी मुलीचा भाऊ हा दुपारी ३ वाजता कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याची बाहिण दिसली नाही. त्याने मामा व आजी यांच्या घरी जावून तपास केला असता मुलगी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वत्र तिचा शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखरे रविवारी १० जुलै रोजी दुपारी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.

Exit mobile version