Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा स्थगित

EA9hqi6XUAEBNQx

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असून जम्मू काश्मीर सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना पुन्हा परतण्यासाठी व्यवस्था करत तात्काळ काश्मीर सोडा अशी सूचना केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने अमरनाथ यात्रा १३ दिवस स्थगित करण्यात आली आहे.

 

आज(शुक्रवार) भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्रितपणे घेतलेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले की, मागील काही दिवसात पकडलेले दहशदवादी आणि त्यांच्या ठिकाणावरुन जप्त केलल्या वस्तुंवरुन हे स्पष्ट झाले आहे की, पाकिस्तान काश्मीरमध्ये काहीतरी मोठी दहशदवादी योजना आखण्याच्या तयारीत आहे. पण, सध्या सीमेवर स्थिती सामान्य आहे. दरम्यान अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु होणार की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित ठेवली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version