Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरचे शंख वादक पथक अयोध्या सोहळयात सहभागी होणार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अमळनेरचे सुपुत्र नितीन महाजन यांचे शंख वादक पथक सहभागी होणार आहे. महाजन यांच्या केशव शंख नाद पथकास अयोध्येतून विशेष निमंत्रण मिळाले आहे.या पथकाचे १११ वादक शरयूतीरी शंख नाद करणार आहेत.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित् त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पुण्यातील शंख वादन करणाऱ्या केशव शंख नाद पथकाला अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे.‎२३ आणि २४ जानेवारी रोजी श्रीराम‎मंदिरासह अयोध्येतील विविध‎चौक आणि शरयू नदीच्या तीरावर‎होणाऱ्या आरतीवेळी ते शंख नाद‎करणार आहोत. लहान मुलांपासून‎ते ८० वर्षांपर्यंतचे वादक वादन‎करणार आहेत. अशी माहिती‎पथकाचे प्रमुख नितीन महाजन‎यांनी दिली आहे.एका ठिकाणी‎असलेल्या धार्मिक कार्यक्रमात‎केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या‎नजरेत हे शंख नाद पथक पडून‎त्यांना प्रचंड भावल्याने‎रामलल्लाच्या या सर्वाधिक मोठ्या‎महोत्सवाचे निमंत्रण महाजन यांच्या‎पथकास मिळाले आहे.‎
भारतातील पहिले शंख नाद पथक,१११ सदस्य अमळनेर शहरातील माळीवाडा भागातील मूळचे रहिवासी असलेले नितीन गोकुळ महाजन पुण्यात स्थाईक असून तेथे आपल्या कौशल्यातून मोठे बस्तान त्यांनी बसविले आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल ते पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.एक आवड म्हणून केशव शंख ‎नाद पथकाची निर्मिती त्यांनी स्वतः‎केली असून या संस्थेचे ते‎संस्थापक अध्यक्ष आहेत. हिंदुस्थान‎मधील हे पहिले पथक असून लहान‎मुलांपासून ते ८० वर्षांपर्यंतचे शेकडो‎वादक त्यांचे सदस्य आहेत. यात ‎अनेकांना प्रशिक्षित केले आहे.‎‎

Exit mobile version