Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात विविध क्षेत्रात महिलांची गगन भरारी !

31d2d5cc 1ad7 4bae bce2 b7c5b55d6044

अमळनेर : ईश्वर महाजन

 

अमळनेर तालुक्यात अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून अनेक महिलांना मार्गदर्शन ठरत आहेत. प्रशासकीय ,राजकीय, सामाजिक, शैक्षणिक एकंदरीत सर्वच क्षेत्रात महिलांची गगन भरारी तालुक्यातील सर्वांसाठीच अभिमानास्पद बाब ठरत आहे.

अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे यांनी नुकताच पदभार घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कर्मचारी प्रशिक्षण वर्ग घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून व अत्यंत चांगल्या पद्धतीने कामगाज सांभाळीत आहेत प्रशासनाचा त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे.

 

अमळनेर तहसीलदारपदी नुकतीच नियुक्ती होऊन आलेल्या ज्योती देवरे यांचे वकृत्व ही चांगले असून प्रशासनाचा त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव असल्याने पाडळसरे जनआंदोलन समितीच्या जेलभरो आंदोलनात प्रशासनाची भूमिका मांडून तमाम अमळनेर करांची मने जिंकली आहेत. नुकतीच अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या डंपर चालक मालक याच्यावर यांनी पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. एकंदरीत यांचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहेत.

 

अमळनेर शहराच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या हातात नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून अंमळनेर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. लोकांना वेळेवर पाणी स्वच्छता, रस्ते ,थोर पुरुषांची पुतळे, बगीचा, अनेकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिली आहेत. विविध कामे करून अमळनेर शहरातील मतदारांचे मन त्यांनी अल्पावधीमध्ये जिंकून घेतले आहेत.

 

आमदार स्मिता वाघ यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये मोठे काम असून अनेक ग्रामीण भागातील रस्ते, विविध कामांसाठी निधी आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत एक महिला आमदार म्हणून त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक विकासकामे केली आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून शाळांचा व शाळा परिसराचा चेहरा-मोहरा बदलून टाकलेला आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी जिल्हा बँकेत संचालिका पदापासून मजल मारून राष्ट्रवादी पक्षांमध्ये गेल्या काही वर्षापासून प्रामाणिकपणे काम करीत आहेत.
खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन वसुंधरा दशरथ लांडगे यांचे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्य तमाम महिलांना प्रेरणादायी आहे जन आंदोलन सत्यशोधक विवाह यामध्ये त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे त्या अनेक पदांवर कार्यरत असून आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.

एडवोकेट तिलोत्तमा पाटील सामाजिक क्षेत्रात काम करून वकील व्यवसायाच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांची सेवा करणे दिवाळीचा सण गोरगरीब लोकांबरोबर साजरा करणे. वकील व्यवसायाच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था व कायद्याची माहिती व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये शिबिरे आयोजित करणे, हे काम अॅड. तिलोत्तमा पाटील गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत.तसेच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ही त्यांचे काम कौतुकास्पद आहे.
महिला पत्रकार जयश्री साळुंखे यांनी तालुक्यात आदिवासी समाजातील मुलांसाठी अनेक आंदोलन करून त्यांच्या मागण्यांसाठी सदैव त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत. पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून अनेक ज्वलंत समस्यांना त्यांनी आतापर्यंत वाचा फोडली आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

 

काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅड. ललिता पाटील यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा थोड्या मतासाठी आमदार की हुकली, तेथेच न थांबता शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एडवोकेट ललिता पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे अमळनेर तालुक्यात अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केलेली आहे.

 

आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील अनेक महिलांची थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. तालुक्यातील अनेक अशा महिला आहेत की,ज्याने समाजासाठी मोठं काम करीत आहेत. त्यात आधार संस्थेच्या भारती पाटील , माधुरी पाटील, प्राध्यापक शीला पाटील, सानेगुरुजी वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्राध्यापक माधुरी भांडारकर शिक्षिका वंदना ठेंग,यांनीही सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे.

Exit mobile version