अमळनेर शहरात रथोत्सव उत्साहात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त शहरातून रात्री लालजींचा रथोत्सव काढण्यात आला. कोविडनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या रथोत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती होती.

अमळनेर येथील येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालाजींच्या रथाची भव्य मिरवणूक निघते. या रथातून लालजी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती या रथात सामावालेली होती. अक्षय तृतीयेपासून संत सखाराम सखाराम महाराजांच्या यात्रेला उत्साहात सुरु झाली आहे. विविध कार्यक्रम साजरे होत असताना गुरूवारी सायंकाळी रथोत्सव साजरा करण्यात आला. यात काल रात्री जयदेव व सख्याहरी यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर रथाची पूजा करून विधिवतपणे मूर्त्या विराजमान करण्यात आल्या. रथावर बसण्याचा मान ब्रम्हे व वैद्य पुजारी यांना मिळाला. संस्थानातील मंदिराजवळून रात्री ८ वाजेच्या सुमारास रथाची मिरवणुकीस सुरुवात झाली.

याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक प्रवीण पाठक, भाजपचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे, नगरसेवक राजेश पाटील, नरेंद्र संदानशिव, नीलेश भांडारकर, महेश कोठावदे, प्रभाकर वाणी, किरण गोसावी, अनिल महाजन यांच्यासह भाविक उपस्थित होते.

कोविडनंतर पहिल्यांदाच आधीप्रमाणे रथोत्सव काढण्यात आल्याने यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसराच चैतन्यदायी वातावरण पसरले होते. रथाच्या पुढे भगवे ध्वजधारक दोन घोडेस्वार होते. त्यांच्यापाठोपाठ वारकरी व नगारे होते. सोबतच अब्दागिरी-धारक सेवेकरी व मशाल-धारी सेवेकरी होते. यातील लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले. रथाच्या मागे लहान गाड्यावर महाराजांच्या चांदीच्या पादुका व मुखवटा ठेवला होता. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात आला. रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाद महाराजांसह रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी आरत्याही झाल्या.
वाडी संस्थानातून निघालेला हा रथ पानखिडकी, सराफ बाजार, बोरी नदीतून पैलाड, मातंगवाडा, कसाली मोहल्ला मार्गे पहाटे परत वाडी संस्थामध्ये परतला. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त राखण्यात आला होता.

Protected Content