Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरची भूमिका घोरपडे एकपात्री अभिनय स्पर्धेत राज्यातून द्वितीय

अमळनेर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेंतर्गत महाराष्ट्रभरातून घेण्यात आलेल्या आविष्कार स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाअंतिम फेरीत ३३ जिल्यातून १९० विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला. यातील एकपात्री अभिनय स्पर्धेत येथील भूमिका घोरपडे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिला सात हजार रुपये रोख व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले आहे.

 

दि. २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली ही स्पर्धा, काव्यवाचन तसेच एकपात्री अभिनय या दोन प्रकारांत घेण्यात आली. या स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक १ आणि २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुण्यातील सावरकर अध्यासन केंद्र येथे अतिशय उत्साहात पार पडली. दि. १ फेब्रुवारी रोजी नाट्य सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष तसेच सिनेनिर्माते आणि अभिनेते अरूण नलावडे यांच्याहस्ते एकपात्री अभिनय स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले तर दि.२ फेब्रुवारी रोजी सुप्रसिध्द कवी संदीप खरे यांच्या हस्ते काव्य वाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. तसेच स्पर्धेच्या राज्यभरातील जिल्हा समन्वयकांचाही खरे यांच्याहस्ते संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

महाअंतिम फेरीतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

प्रथम- श्रावणी केलूसकर, मुंबई
द्वितीय- भूमिका संदीप घोरपडे, अमळनेर, जि.जळगाव
तृतीय- कणाद देशपांडे, सोलापूर
चतुर्थ- मयुरेश केळुसकर, कल्याण
पंचम- मृदुला विलग, नाशिक

Exit mobile version