Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा संप; भाजपातर्फे संपाविरोधात आक्रमक भूमिका

अमळनेर प्रतिनिधी । गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्‍यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेध म्हणून पंचायत समिती कामगारांनी संप सुरू केला असताना पंचायत समितीला टाळे ठोकले. तर याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पंचायत समितेचे सर्व दालने उघडे केले. तथापि, दिवसभर असेच नाट्यमय उद्योग सुरु असल्यामुळे गावात चर्चेला उधाण आले आहे. 

मठगव्हान येथील सरपंचांनी गटविकास अधिकारी संदीप वायाळ व विस्तार अधिकारी एल डी चिंचोरे, अनिल राणे यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे आमची मानसिकता खराब झाली असे असे लेखी निवेदन तहसीलदारांना देऊन पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले यावेळी कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजीही केली मात्र संतापाच्या भरात कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वार सह , सभापती दालन व सर्व विभागांना कुलूप लावून कर्मचारी निघून गेले कुलूप लावल्याने पदाधिकारी अथवा नागरिकांना पंचायत समितीत प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला त्याचे वृत्त पसरताच भाजप पदाधिकारी धावत आले आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला सभापती, उपसभापती,सदस्य यांच्या दालनास देखील कुलूप असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या काही वेळात मुख्य प्रवेशद्वार उघडण्यात आले त्यांनतर भाजप कार्यकर्त्यांनी आवारात दालनाबाहेर ओट्यावरच ठिय्या मांडल्याने पंचायत समिती कर्मचारी नरमले आणि काही वेळातच सर्व दालन उघडण्यात आले व काही कर्मचारी देखील कार्यालयात उपस्थित झाले दरम्यान कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य विभागाचे काम सुरू होते.

भाजप पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी तपासून पाहिली असता कर्मचाऱ्यांनी सकाळी ऑनलाईन हजेरी लावून कुलूप लावून पळून गेल्याने नागरिकांची व प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करून पदाधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना  प्रवेशापासून रोखणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

पंचायत समिती चे सहाययक प्रशासन अधिकारी के. टी. पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी बी.जे. बाविस्कर, वरिष्ठ सहाययक ओ. टी. ठाकूर, कनिष्ठ सहाययक एस. बी. पाटील, वरिष्ठ सहाययक एस. यु. पाठक, सी. जे. देसले, आर. डी. सोनवणे, एस बी भदाणे , एम. जे. वर्मा , जे. व्ही. पवार ,अनिल पाटील, के. व्ही. सनेर , डी. आर. पाटील, जे. एम. चव्हाण, एस. सी. साळुंखे, व्ही. बी. रामकुवर, एस. झेड. जाधव, वाय. पी. पाटील, टी. के. शिंपी, के. बी. ठाकरे यांच्यासह 51 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिआंदोलनात तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार, माजी सभापती श्याम अहिरे, शितल देशमुख, राकेश पाटील, मिलिंद पाटील, मेहरगाव सरपंच शरद पाटील, बापू पाटील, संजय पाटील, पतींग राव पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र चौधरी, उप सरपंच मच्छीन्द्र पाटील, गुलाब खाटीक सहभागी झाले होते.

Exit mobile version