Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिवंगत उदय वाघ यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी । भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत उदय वाघ यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त उद्या शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय वाघ यांच्या प्रथम स्मृतिदिनी सकाळी विविध गावांमध्ये प्रतिमा पूजन व सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यांचे मूळ गाव असणार्‍या डांगर बुद्रूक येथे आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील दोधवद येथे सार्वजनिक वाचनालयात कै. उदय वाघ यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे.

यानंतर अमळनेर येथे सायंकाळी ४ वाजता बाजार समिती समोरील ट्रक टर्मिनसच्या प्रांगणात सर्वपक्षीय स्मृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version