Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरे ते शहापूर रस्त्याची सहा महिन्यात वाताहत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे ते शहापूर रस्त्याची अवघ्या सहा महिन्यांत वाताहात झाली असून याबाबत कळमसरेसह परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, कळमसरे ते शहापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता गेली अनेक वर्षे उपेक्षित राहिला आहे. कळमसरे ते शहापूर हे अंतर फक्त सहा किमी असून,हा रस्ता मुख्यत्वे पुढे जाऊन नरडाणा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर भिडतो.त्यामुळे साहजिकच अमळनेर हुन शहापूर मार्गे थेट मध्यप्रदेश इंदोर कडे जाण्यासाठी कमी अंतराचा व सोयीस्कर असल्याने अननेकांची वेळेची बचत होतं असते.परंतु एकाचवेळी पूर्णतः डांबरीकरण होत नसल्याने या रस्त्याच्या नशिबी नरकयातना सोसाव्या लागत आहेत. सद्यस्थितीत या रस्त्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात सुमारे ४० लक्ष रुपये निधी साडे सतराशे मीटर अंतरासाठी डांबरीकरणचे काम हाती घेण्यात आले होते.

या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य जयश्री ताई पाटील यांच्या उपस्थितीत आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.रस्त्याचे काम निवेदेनुसार व गुणवत्ता पूर्वक व्हावे यासाठी ग्रामस्थांनी ठेकेदाराकडे विनंती देखील केली होती.तर दुसरीकडे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप उर्फ शिवाजी राजपूत यांनी रस्त्या नित्कृष्टतेवर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली होती.आजच्या घडीला या रस्त्याच्या नवीन कामाची पुर्णतः वाताहत झाली असून,ठिक ठिकाणी डांबर उखडून खडी बाहेर येऊन पडलीआहे. संबंधित याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा देखील आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

एकीकडे रस्तासाठी लाखो रुपये निधी मंजूर होतो खरा;मात्र रस्ते खरच गुणवत्ता पूर्ण होतात का?अशी नित्कृष्ट कामे करणारे ठेकेदारांना यापुढे कॉन्ट्रॅक्ट देतांना तसेच दुर्लक्ष करणार्‍या अधिकारींवर लोकप्रतिनिधी यांनीदेखील जाब विचारला पाहिजे,नाहीतर तेवढी भरपाई करून घेतली पाहिजे असं देखील ग्रामस्थांमधून बोललं जातं आहे.
दरम्यान पुढील टप्प्यात या रसत्यावरिल वाहन सेवा फक्त आणि फक्त रस्ता खराब असल्याने पूर्णता बंद पडली आहे.मागील तीन वर्षापासून यामार्गाने जाणारी शिरपुर बससेवा बंद पडली आहे.ती आता वेगळ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.

Exit mobile version