Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे अमळनेरात आगमन

अमळनेर प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांचे आज अमळनेरात आगमन झाले असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आज अमळनेर दौरा आहे. यात ते अमळनेरात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच ते तेथूनच एरंडोल येथील पोलीस स्थानकाच्या नूतनीकरणाचेही ई-उदघाटन करणार आहेत. याशिवाय, त्यांच्या उपस्थितीत अन्य कार्यक्रम होणार आहेत. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Exit mobile version