Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले गृहमंत्र्यांचे स्वागत

अमळनेर प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांचे आज अमळनेरात आगमन झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आज अमळनेर दौरा आहे. यात ते अमळनेरात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच ते तेथूनच एरंडोल येथील पोलीस स्थानकाच्या नूतनीकरणाचेही ई-उदघाटन करणार आहेत. याशिवाय, त्यांच्या उपस्थितीत अन्य कार्यक्रम होणार आहेत. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वागत झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version