Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथे काँग्रेसची सुकाणू समिती जाहीर

अमळनेर प्रतिनिधी । आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर येथे काँग्रेसच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने आगामी निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले असून नियोजन करण्यासाठी सुकाणू समिती जाहीर केली आहे. यात नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर तालुका शेतकी संघ, अमळनेर तालुका फ्रुट सेल सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी ही समिती गठीत केली आहे.
या समितीत सदस्य म्हणून शांताराम शामराव पाटील व जयवंत मन्साराम पाटील, धनगर दला पाटील, सुरेश पिरन पाटील, प्रा. सुभाष सुकलाल पाटील, भागवत केशव सूर्यवंशी, संदीप बाबुराव घोरपडे, चंद्रकांत भगवानदास शर्मा, नरेंद्र संदानशिव, विनोद राजधर पाटील, रज्जाक शेख मनोज भाऊराव पाटील व सुलोचना वाघ, गोकुळ नामदेव बोरसे, डॉ. अनिल शिंदे, अशोक बाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक लढवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांनी समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version